Monday, August 23, 2021
संत कवयित्री बहीणाबाई चौधरी, जगण्यातून जन्मलेल तत्वज्ञान - मकरंद जोशी
मैत्री...., बालपणी सामाजिक जीवन सुरू होण्याचा पहिला, रंजक, अविस्मरणीय अनुभव.
Friday, August 13, 2021
अवयवदान अभियानाचे संस्मरण. "माझी लिव्हर ट्रान्सप्लांट यात्रा - थर्ड इनिंग" - आदरणीय श्री दीलीपभाई देशमुख दादा
आज " वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे" म्हणजेच "जागतिक अवयवदान दिन - 2021" अवयवदान केल्याने ज्यांची अवयव निष्क्रीय झालेली आहेत त्यांना अंग प्रत्यारोपणाद्वारे नवजीवन मिळते. जीवन जगण्याची नवीन संधी मिळते.
बालपणा पासून समाज सेवेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पीत केलेले आदरणीय दादा म्हणजे श्री दिलीप भाई देशमुख यांना स्व. महर्ष पटेल यांच्या लिव्हर प्रत्यारोपणामुळे नवीन आयुष्य लाभले. दादांनी त्यांच्या आयुष्याच्या दोघी इनिंग समाज कार्यासाठी वाहून नेल्या होत्या आणि तिसऱ्या इनिंगच्या काळात ते समाजकार्यात व्यस्त असतांना लिव्हरच्या आजाराच्या असहाय्य पिडेत सापडले परंतु दृढ मनोबळ आणि अगाध आत्मबळाच्या जोरावर दीर्घकाळ पीडादायक प्रतिक्षा काळ पुर्ण करुन लिव्हर प्रत्यारोपणाच्या कठीण प्रक्रियेतून स्वस्थ बाहेर पडले आणि उर्वरित आयुष्याची तिसरी इनिंग अवयवदान या महादानाच्या प्रचार अभियानासाठी वाहून नेण्यास सुरुवात केली.
दादांनी अवयवदानाच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांचा अनुभव " माझी लिव्हर ट्रान्सप्लांट यात्रा - थर्ड इनिंग" या पुस्तकात अंकित केला आहे. याची प्रथम आवृत्ती सुरत येथे प्रकाशीत करण्यात आली होती व त्याची दुसरी आवृत्ति देखील प्रकाशीत झाली आहे. हल्ली दादांनी गुजरातभर वेगवेगळ्या शहरात अवयवदानाचे प्रचार अभियान चालवले आहे. अवयवदाना विषयी समाजात जागृती आणण्यासाठी विविध कार्यक्रम सुरु केलेत, विविध संस्था, डॉक्टर्स, वेगवेगळ्या सामाजिक संस्था, विद्यार्थी, त्याच्याशी जुळलेली लोकं यांच्या व्यक्तिगत आणि सामुहीक भेटीगाठी करून, सतत प्रवास करून सोशल मीडिया आणि इतर मध्यामांद्वारे अवयवदानाच्या प्रचार प्रसारात आयुष्याची तिसरी इनिंग समर्पीत केली आहे. आज जागतिक अवयवदान दिना निमित्त त्याच्या या अविरत समाज सेवेच्या कार्याचे प्रेरक स्मरण व स्वास्थ आयुष्याची मंगल कामना.
स्व. महर्षभाई पटेल तसेच प्रसंगी अंगदान करणारे आणि समाजासाठी आपले संपुर्ण आयुष्य समर्पीत करुन आयुष्याच्या उत्तरार्ध देखील अवयवदानाचे अभियान उभे करणारे ऋषीतुल्य आदरणीय श्री दीलीपभाई देशमुख दादा यांना वंदन.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ।। अर्थ : सर्वानी सुखी व्हावे, सर्वांनी रोगमुक्त रहावे, सर्वांनी मंगलमय घटनांचे साक्षी व्हावे आणि कुणालाही दु:ख मिळू नये.
શ્રી હર્ષદ મહેતા (DCP સુરત ) દ્રારા "મિશન કોસાડ" અંતર્ગત સ્થાનીક લોકો સાથે સંવાદ સાધવામાં આવ્યો.
29 જાન્યુઆરી 2023 ના રોજ અમરોલી પોલીસ સ્ટેશન દ્વારા માનનીય શ્રી હર્ષદ મહેતા સાહેબ DCP ZONE - 5ની અધ્યક્ષતામાં સાંજે 4 વાગે કોસા...
-
सुरत ते चंदिगढ आणि तिथून नारकंडा बुलेट ट्रिप - मकरंद जोशी भारत विविधतेने नटलेला देश आहे. विविध उत्सव, भाषा, लोक, परंपरा इतिहासाची त्याला...
-
शिक्षक दिन, न.प्रा.मराठी.शाळा. तीस पस्तीस वर्षा पूर्वीची गोष्ट नगर प्राथमिक शिक्षण समितीची अमाची शाळा नंबर 223. आता ती 264 झाली आहे. त्य...
-
मैत्री........ बालपणीच्या आठवणी आपण कधीच विसरत नाही... तसच एक नात चिरस्मरणीय असतं ते म्हणजे बालपणीची मैत्री ! लहानपणी नाकातून ...