आरती मंसाराम वाडीले ह्या विद्यार्थिनीने " कण रगडीता तेल ही गळे " ह्या म्हणीला सार्थक केले आहे. सरकारी मूलभूत स्त्री अध्यापन मंदिर, सुरसागर, बडोदे येथील D.El. Ed (PTC) कॉलेजची तालिमार्थी "आरती मंसाराम वाडीले" हीने गुजरात राज्य परीक्षा बोर्ड द्वारा आताच घोषित करण्यात आलेल्या द्वितीय वर्ष मराठी माध्यमाच्या निकाला मध्ये संपुर्ण गुजरात राज्यात 85.13% मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. ह्या विद्यार्थिनीने रात्र-दिवस खुप मेहनत करून ही सिद्धी मिळविली आहे. शाळावृंद आणि संपुर्ण समाजासाठी खुपच गर्वची गोष्ट आहे.
"आरती मंसाराम वाडीले" ही मुलगी खुपच गरीब कुटुंबातुन येते. तिचे वडील "मंसाराम नामदेव वाडीले" भंगार विकण्याचे काम करतात. प्रत्येक महिन्याला जास्तीत जास्त दहा हजार पर्यन्त कमवितात. तिची आई सुरेखा बाई एक कुशळ गृहिणी आहे. ह्या मुलीने खुपच परिश्रम करून संपुर्ण गुजरात राज्यात मराठी माध्यमाच्या PTC मध्ये प्रथम क्रमांक पटकविला आहे. तसेच ती नगर प्राथमिक शिक्षण समिती संचालित श्री रणजित भाई देसाई शाळा नंबर-106,संजयनगर,लिंबायत,सुरत ची विद्यार्थिनी आहे. आरती ईतर गरीब आणि परिश्रमी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणारूप बनली आहे. संपुर्ण शाळा परिवार आणि समाज तिच्यासाठी गर्व अनुभवित आहे. तसेच तिला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन पाठवीत आहे.
No comments:
Post a Comment