सुरत मधील कु. आरती मंसाराम वाडीले ह्या विद्यार्थिनीने बडोदे येथील मूलभूत स्त्री अध्यापन मंदिर मधील मराठी माध्यम PTC अभ्यासक्रमात वर्ष २०२१ मध्ये ८५. १३ % मिळवून संपूर्ण गुजरात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सुरत, गुजरात मधील आणि इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून फलाट ब्लॉगने कु. आरती वाडिले यांची मुलाखत घेतली आणि त्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशा विषयी त्यांच्याशी बातचीत केली. विद्यार्थ्याना आणि फलाटच्या वाचकांना ही मुलाखत नक्कीच प्रेरक ठरेल अशी आशा.
१) बदोद्या मध्ये तुम्ही कोणता अभ्यास करीत आहात ?
बडोद्या मध्ये मी दोन वर्षाचा PTC कोर्स करीत आहे. प्राथमिक शिक्षक बनण्यासाठी किमान पात्रता, PTC कोर्स करून शिक्षक बनता येते.
२) तुम्ही PTC कसं जॉईन केलं ?
सुरत नगर प्राथमिक शिक्षण समिती मध्ये माझे मामा श्री महेंद्र खैरनार हे शिक्षक म्हणून सेवा देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी PTC जॉईन केलं.
3) गुजरात मध्ये प्रथम क्रमांक मिळवून कसं वाटतंय ?
गुजरात मध्ये प्रथम क्रमांक मिळवुन खुपच छान वाटत आहे. सगळी कडुन खुप शुभेच्छा येत आहे आणि खूप कौतुक होत आहे म्हणून खूपच आनंद वाटत आहे. कुठे तरी जवाबदारी वाढल्याची जाणीव ही होत आहे. पण माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर वीलसलेल समाधान माझ्यासाठी अमूल्य आहे.
४) तुमचं स्वप्न काय आहे ?
पुढे जाऊन मला IPS बनण्याची ईच्छा आहे त्यासाठी मी तैयारी करीत आहे. मार्ग कठीण असला तरी माझे आई वडील माझ्या पाठीशी आहेत आणि मी ही मेहनत घ्यायचं ठरवलं आहे.
५) PTC अभ्यासात तुम्ही गुजरात मध्ये पहिला आलात. तुम्ही कसा अभ्यास केला ?
PTC मध्ये मी नियमित, रात्र-दिवस मेहनत केली व जेवढे शक्य झाले तेवढे जास्त परिश्रम केले. अभ्यासावर अधिक भर दिला. विषयांना समजून घेतले. बारकाईने विषय त्यांची मांडणी यांचा अभ्यास केला. अभ्यासाच्या टास्कला प्राथमिकता दिली. कठीण परिश्रमा शिवाय पर्याय नाही.
६) तुमचं आदर्श कोण आहे ?
स्त्री शिक्षणाला वाटचाल देणाऱ्या क्रांतिज्योती आदरणिय सावित्रीबाई फुले माझ्या जीवनाच्या आदर्श आहेत. त्यांच्या प्रेरणेने मी आज ह्या स्तरावर उभी आहे. कुठल्याही कठीण प्रसंगी त्यांचे जीवन आणि त्यांनी घेतलेले श्रम मला निरंतर पुढे जाण्याची प्रेरणा देतात.
७) मुलगी म्हणून सुरत बाहेर, दुसऱ्या शहरात शिकायला जाण, किती कठीण वाटत होत ? कसं जमवलं ?
हो, मुलगी म्हणून दुसऱ्या शहरात शिकण्यास जाणे खूपच कठीण काम असते. अनोळखी लोक, अनोळखी जागा, नवीन नवीन सर्व मॅनेज करणे खुप कठीण वाटते पण मग नंतर सवय होते. म्हणून आपण मागे सरकायला नको. साजाग आणि सभान राहून आपण पुढे जात राहायला पाहिजे. माझ्या आई वडिलांनी आणि मामांनी मला नेहमी शिक्षणासाठी प्रेरणा दिली आणि प्रोत्साहित केलं. नवीन नवीन अवघड होत तरी मी शिकत गेले आणि माझं लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. मुलगी म्हणून, आलेल्या संधी किव्वा स्वप्न सोडू नये. मेहनत करून पुढे जात राहवे.
(स्थानिक नगर सेवक श्री सुधाकर एल. चौधरीं द्वारा कु. आरती वाडीलेचा सन्मान)
८) विद्यार्थ्याना काय सांगाल ? अभ्यास कसा करावा ?
माझ्या मतानुसार तर प्रत्येक विद्यार्थ्याने नियमित सुरवाती पासुन अभ्यास करावा. अभ्यासक्रम समजून घ्यावा. त्यानुसार पुस्तक आणि इतर बाबीं विषयी अभ्यास करत राहाव. आपल्या अभ्यासातल्या उणीवा ओळखून त्या दूर कराव्या. नियमित आणि सतत अभ्यास ही यशाची किल्ली आहे असं मला वाटतं. यशाचा शॉर्टकट नाही.
९) विद्यार्थ्याना काय संदेश द्याल ?
माझ्या इतर सर्व मित्राना एकच सांगु इच्छते की, जगात प्रत्येक कार्य शक्य आहे; काहीही अशक्य नाही. फक्त मना पासून खूपच मेहनत करा. तुम्हास यश नक्कीच मिळेल.
१०) अशी गोष्ट जी विद्यार्थी जीवनात तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटते ती कोणती ?
प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे, परिश्रम ...आपल्या जीवनात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला परिश्रम घ्यावेच लागतात. म्हणूनच त्याचा कधीही कंटाळा करू नये. प्रत्येक समस्या आणि परिस्थिती आनंदाने स्वीकार करून तिला तोंड द्या. तसेच आपले जीवन असे घडवा की इतरांना आपल्या पासून प्रेरणा मिळायला हवी.