Wednesday, November 17, 2021

"अवयवदान रथ" गुजरात मध्ये गावो- गावी फिरून अवयवदान जागृतीचे महापर्व सुरू करणार. लघुपट "तर्पण", अवयव दान रथ आणि जागृती पोस्टर्सचे आदरणिय श्री दिलीप भाई देशमुख दादा आणि श्री सी.आर. पाटील साहेबांच्या हस्ते विमोचन कारण्यात आले.

      बालपणापासून समाज आणि राष्ट्रसेवे साठी ज्यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन समर्पित केले आहे असे सर्वांचे मार्गदर्शक ऋषितुल्य आदरणीय श्री दिलीप भाई देशमुख दादा यांच्या द्वारे गुजरात मध्ये "अवयवदान" जागृतीचे महाअभियान चालवण्यात आले आहे. याच महाअभियाना अंतर्गत ता.१६/११/२१ रोजी गांधीनगर गुजरात येथे १) तर्पण - लघुपट, २) अवयवदान रथ, आणि ३) अवयवदान पोस्टर यांचे अंगदान चेरीटेबल ट्रस्ट द्वारे आदरणीय श्री दिलीप भाई देशमुख आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष सांसद श्री सी.आर.पाटील साहेब यांच्या हस्ते गांधीनगर गुजरात येथे अनावरण करण्यात आले. 
    मागच्या २ महिन्यापासून ९ अवयव दान करवून घेणाऱ्या डॉक्टरांच्या पथका मधील अहमदाबाद येथील डॉ. पुंचिका पवन आणि भावनगर शहरातील डॉ. भावेश मोदी यांची विशेष उपस्थिती होती.     या कार्यक्रमात आदरणीय श्री दिलीप भाई देशमुख दादा म्हणाले होते की, गुजरात मध्ये अवयवदान विषयी महापर्व सुरू करावयाचे आहे. या पर्वा अंतर्गत संपूर्ण गुजरात राज्यात अवयवदान विषयी जागृती करायची आहे. त्याच प्रमाणे ते म्हणाले की ब्रेनडेड व्यक्ती द्वारे अवयव दान केल्यास सात ते आठ लोकांना नवजीवन मिळत असते. अवयवदान प्रक्रियेत डॉक्टरांची प्रक्रिया अत्यंत जटिल असते परंतु तत्पूर्वी ब्रेनडेड व्यक्तीच्या परिवार आणि आप्तजणांना अवयव दान करण्या वषयी जागृत करणे, तैयार करणे अत्यंत कठीण कार्य असते. हे एक सामाजिक कार्य आहे. या विषयी समाजात जागृती आणण्याचे  कार्य समाजातुन व्हायला हवे हे कार्य आपले आहे. 
    गुजरात मध्ये  अवयवदान रथा द्वारे अवयवदाना विषयी जागृती कार्यक्रम करण्यात येणार आहेत. गुजरात मधील  समग्र जिल्हे, तालुके आणि गावोगावी लोकांपर्यंत हा अवयव दान रथ पोचणार आहे व अवयवदान जागृती करणार आहे. "अवयवदान रथ "  कार्यक्रमा अंतर्गत शहरातील डॉक्टर, तरुण, विद्यार्थी, बंधू भगिनी, विविध संस्था, त्यांच्याशी जुळलेले सभासद, नागरिक यांच्या मध्ये अवयव दान जागृती साठी ठिकठिकाणी अवयव दान जागृती लघुपट " तर्पण" प्रदर्शित करण्यात येईल, अवयव दान जागृतीचे पोस्टर, सभा, मिटिंगा, संवाद द्वारे लोकांमध्ये अवयव दानाची जागृती पसरवण्यात येणार आहे.
     आपले पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी यांनी देखील "मन की बात" या कार्यक्रमात "अवयव दाना"चा संदेश दिला आहे. 
 "अवयवदान रथ" महाजागृती अभियाना अंतर्गत समग्र गुजरात राज्यात "अवयव दान जागृतीचे एक महापर्व सुरू होत आहे. जे अवयव दानाच्या क्षेत्रात गुजरात मध्ये एका ऐतीहासिक पर्वाची सुरुवात असणार आहे. या पर्वा अंतर्गत विविध अवयवांची आवश्यकता असणाऱ्या ३ लक्ष लोकांची प्रतीक्षा यादी शुन्य व्हायला हवी,  इतकी अवयव दान संबंधी जागृती करावी लागणार आहे. गुजरात मध्ये कुणाला लीवर, कुणाला, किडणी तर कुणाला लंग्ज सारख्या जीवन संजीवनी देणाऱ्या अंगांची आवश्यकता आहे. कुणाचं बाळ तर कुणाचे आई वडील, तर कुणाची मुलगी तर कुणाच्या काळजाच्या तुकड्याला अवयव दाना द्वारे नवीन अवयव मिळाले तर त्यांना नवीन जीवन मिळून जाईल. अवयवदान हे नवीन आयुष्याचे दान आहे आणी लोकांना हेच नवीन जीवन मिळवून देण्यासाठी आदरणीय श्री दिलीप भाई देशमुख दादांनी अथक महाभियान सुरू केले आहे. सर्वांना या अभियाना अंतर्गत लोकांमध्ये  "अवयवदानाचे महत्व समजविण्याची आणि अवयव दाना विषयी जागृती पसरवण्याची विनंती आहे.  "अवयवदान महादान" 

No comments:

Post a Comment

શ્રી હર્ષદ મહેતા (DCP સુરત ) દ્રારા "મિશન કોસાડ" અંતર્ગત સ્થાનીક લોકો સાથે સંવાદ સાધવામાં આવ્યો.

 29 જાન્યુઆરી 2023 ના રોજ અમરોલી પોલીસ સ્ટેશન દ્વારા માનનીય શ્રી હર્ષદ મહેતા સાહેબ DCP ZONE - 5ની અધ્યક્ષતામાં સાંજે 4 વાગે કોસા...